
नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार प्रत्येकी दोनमधील एका ग्राहकाचे ऑनलाइन प्रॉडक्ट आणि सेवा खरेदी करत्यावेळी सुविधा शुल्क आकारले जाते. एवढचं नव्हे तर 78 टक्के ग्राहकांनी हे सांगितलं की, ऑनलाइन खरेदीसाठी ते अतिरिक्त शुल्क न आकारणाऱ्या प्लॅटफॉर्म्सना प्राधान्य देतील. हा सर्वे लोकल सर्कलद्वारा घेतला गेला. यामध्ये 321 जिल्ह्यामधील 40 हजारपेक्षा जास्त लोकांची मतं घेण्यात आली.