केवळ ६ हजारात उभारला ५ कोटींचा Business, संकटांवर केली जिद्दीने मात

Business Success Story: अंकित राय यांची भोपाळमध्ये शक्तीस्टेलर ही सोलर प्रोडक्ट Solar Products तयार करणारी कंपनी असून सध्या त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ५ कोटी इतका आहे. आज ते एक यशस्वी बिझनेसमन Businessman असले तरी त्यांना यश गाठण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे
business success story in marathi
business success story in marathiEsakal

Business success story: अनेकांना आपला स्वत:चा व्यवसाय असावा अशी इच्छा असते. तर काही जण मात्र विचार न करताही एखाद्या व्यवसायात Business उतरतात आणि त्यांना यश Succes संपादन होतं. खरं तर बिझनेस किंवा व्यवसायातून करोडोंची कमाई करणं शक्य होऊ शकतं. Succes Story of Bhopal youth Ankit Goyal making Solar panels

तरी व्यवसाय सुरू करण्यापासून तो उभारण्यासाठी आणि त्यात यश आणि पैसा Money मिळवण्यासाठी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणासोबतच एखाद्या चांगल्या कल्पनेची गरज असते. बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे चांगली आयडिया म्हणजेच कल्पना असणंही तितकच गरजेचं आहे.

शिवाय बिझनेस Business सुरू करताना अनेक अडथळे निर्माण होत असतात. जो हे अडथळे न डगमगता आणि न खचता जिद्दीने पार करतो त्याला व्यवसायात नक्कीच यश येतं. याचच एक उदाहरण म्हणजे भोपाळमधील अंकित रॉय.

अंकित राय यांची भोपाळमध्ये शक्तीस्टेलर ही सोलर प्रोडक्ट Solar Products तयार करणारी कंपनी असून सध्या त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ५ कोटी इतका आहे. आज ते एक यशस्वी बिझनेसमन Businessman असले तरी त्यांना यश गाठण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे आणि अनेक अडथळे पार करावे लागले आहेत. आज आपण अंकित यांच्या यशामागची कहाणी जाणून घेणार आहोत.

अडचणींवर मात करत व्यवसाय सुरु केला

फसवणूक, आईचं निधन, तोटा आणि मग नैराश्य Depression अशा अनेक अडचणींना अंकित यांना सामना करावा लागला. अंकित यांनी भोपाळच्या राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय (RGPV)मधून इलेक्ट्राॅनिक्स मधून बिटेकचं शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये चांगली नोकरी मिळाली. ५ वर्ष ते मुंबईत नोकरी करत होते. दरम्यान त्यांचा विवाह झाला. त्यांनी कुटुंबालादेखील काही दिवस मुंबईत आपल्यासोबत नेलं आणि एक चांगलं आयुष्य ते जगत होते.

मुंबईत नोकरी करत असतानाच अंकित यांच्या आईला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि त्यांना चिंतेन ग्रासलं. आईच्या उपचारांसाठी कुटुंब पुन्हा भोपाळला गेलं. अंकित मात्र मुंबईतील नोकरी करत होते. एकीकडे आईचे उपचार सुरू होते.

मुंबईत मात्र नोकरी करून भोपाळमधील कुटुंबाची काळजी घेणं शक्य होत नसल्याने अंकित नोकरी सोडून भोपाळला परतले. तिथं त्यांनी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र नोकरी मिळाली नाही.

सोलर पॅनलची कंपनी केली सुरू पण...

योग्य पगाराची नोकरी न मिळाल्याने २ वर्ष अंकित बेरोजगार राहिले. मुंबईत नोकरी करत असताना अंकित यांना येत्या काळात सौर उर्जेवरील उपकरणांना किंवा सोलर पॅनलला चांगली मागणी असेल, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून २०१७-१८ सालामध्ये त्यांनी सोलर पॅनल बसवण्याची कंपनी सुरू केली. शक्तीस्टेलर असं त्यांनी या कंपनीला नाव दिलं.

२ वर्ष बेरोजगार असल्यामुळे स्टार्टअप सुरू करण्यासाठी अंकित यांच्याकडे पुरुसे पैसे देखील नव्हते. मात्र, त्यांच्या वडीलांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला.

अंकित यांच्या वडीलांनीच आपल्या मित्राच्या मदतीने अंकितला पहिली ऑर्डर मिळवून दिली. पहिलं सोलार पॅनल बसवून अंकित यांनी ६ हजार रुपये कमावले. व्यवसायातील या पहिल्या कमाईनेच पुढे त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला.

बिझनेस नुकताच सुरू झाला होतो तो ६ महिन्यातच अंकित यांच्या आईचं निधन झालं. अंकित डिप्रेशनमध्ये गेले. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना सांभाळलं.

हे देखिल वाचा-

business success story in marathi
महिलांसाठी Part Time Business आयडिया... पैसा आणि शिक्षण कमी असेल तरी पैसा कमावणं शक्य

फसवणूक आणि विश्वासघात

बिझनेस सुरु झाल्यानंतर अंकितसमोर विविध अडचणी आणि संकट येतच होती. सुरुवातीला अंकितला एक ऑर्डर मिळाली. त्यासाठी त्यांनी स्वखर्चाने सामानाची खरेदी केली मात्र, नंतर त्या व्यक्तीने सोलार बसवण्यास नकार दिला. यामुळे अंकित यांचा मोठा तोटा झाला. एक सिस्टम त्यांनी त्यांच्या घरावरच बसवली.

बिझनेस सोपा करता यावा आणि लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अंकित यांनी त्यांच्या एका ज्युनियरला पार्टनर बनवलं. मात्र तोही अडीच लाख रुपये घेऊन गायब झाला.

मित्राच्या मदतीने अंकितची एका इन्वेस्टरशी ओळखी झाली तो पैसे गुंतवण्यासाठी तयार होता. मात्र त्यानेही कालांतराने नकार दिला. अडचणी येत असतानाही अंकितने मात्र जिद्द सोडली नाही.

कालांतराने अंकित यांची ओळख प्रवीण यांच्याशी झाली. दोघं मिळून एकत्र काम करू लागले. सध्या प्रवीण अंकित यांच्या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग विभाग सांभाळतात. तर अंकित टेक्निकल गोष्टी पाहतात.

अंकित आणि प्रवीण यांनी सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारसोबत काही सरकारी इमारतींवर सोलर पॅनल बसवण्याचं काम सुरू केलं.

मात्र सबसीडी आणि इतर काही कारणांमुळे इथं फारसा फायदा होत नसल्याने ते प्रायव्हेट सेक्टरसाठी काम करू लागले. अंकित यांच्या शक्तीस्टेलर या कंपनीने आजवर ४०० हून जास्त साइट्वर सोलार पॅनल्स बसवले आहेत.

५ कोटींचा टर्न ओव्हर

अंकित यांच्या कंपनीत करोनाकाळापूर्वी २२ लोक काम करत होते. काही काम करणाऱ्यांनी २-३ महिन्यात नोकरी सोडली तर काहींनी स्वत:ची वेगळी कंपनी सुरू केली. सध्या त्यांच्या कंपनीत १० जण कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ३ कोटी होता. तर यावर्षी शक्तीस्टेलर या कंपनीचा टर्नओव्हर ५ कोटी आहे.

अंकित यांची ही यशोगाथा पाहता जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक संकटांवर मात करून यशाचं शिखर गाठता येत हे लक्षात येतं. अंकित यांचं हे यश इतरांना प्रेरणा देणारं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com