Success Story: एकेकाळी बस स्टँडवर विकायचे पेन, एका बिझनेस आयडियाने बदललं जीवन; उभारली तब्बल 2,300 कोटींची कंपनी

कुंवर सचदेव यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची कंपनी उभी केली.
Success Story
Success StoryEsakal

आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, पण आपण प्रयत्न केले तर मोठे यश मिळू शकते. असे बरेच लोक आहेत जगात जे त्यांच्या आयुष्यात समस्या आल्या की खूप लवकर घाबरतात. आयुष्यातील सर्व काही संपल्यासारखे वाटते. परंतु असे अनेक लोक आहेत जे मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जातात आणि यश मिळवतात.

आम्ही तुम्हाला आज अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, एकेकाळी ते बसमध्ये आणि घरोघरी पेन विकायचे, पण ते आज हजारो कोटींच्या कंपनीचे मालक बनले आहे. भारतातील इन्व्हर्टर मॅन म्हणून आज जग त्यांना ओळखतात.

आम्ही बोलत आहोत Su-Kam कंपनीचे फाउंडर कुंवर सचदेव यांच्याबद्दल. त्यांच्या कंपनीच्या सोलर उत्पादनांची मागणी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे.

शिक्षणासाठी पेन विकायचे

प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण कुंवर सचदेव यांनी खासगी शाळेत केले, मात्र कुंवर सचदेव यांना पैशाअभावी पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. कुंवर यांना डॉक्टर व्हायचे होते. पण मेडिकल एंट्रन्स  पास न झाल्यामुळे त्यांनी हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. कुंवर यांनी अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी पेन विकले होते.

असा व्यवसाय सुरू झाला

एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंवर काम करू लागले. देशातील केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकेल असे त्यांना वाटले. नोकरी सोडून त्यांनी यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी Su-Kam कम्युनिकेशन सिस्टीम या नावाने व्यवसाय सुरू केला.

इन्व्हर्टर कंपनी सुरू केली

कुंवर यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता. जो सतत खराब होयचा. एक दिवशी त्यांनी ते इन्व्हर्टर स्वतः उघडले, तेव्हा त्यांना समजले की ही समस्या खराब क्वालिटीच्या सामानमुळे आहे. यानंतर कुंवर यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि 1998 मध्ये त्यांनी Su-Kam पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली.

करोडोच्या कंपनीचे मालक

आज सुमारे 2300 कोटी रुपयांच्या कंपनीचे कुंवर सचदेव मालक आहेत. सोलर प्रोडक्टही या कंपनीत बनवली जातात जी दिवसातील 10 तास वीज देऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची उत्पादने आतापर्यंत भारतातील एक लाखाहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com