
भूषण ओक, शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक
bhushanoke@hotmail.com
मूल्याधिष्ठित गुंतवणुकीच्या चौकटीतील दीर्घकालीन गुंतवणुकीच्या निर्णयासाठी कंपनीचा व्यवसाय, उद्योगक्षेत्रात कंपनीचे स्थान, व्यवसायवाढीच्या संधी आणि जोखमी, स्पर्धात्मक फायदा, आर्थिक मॉडेल आणि व्यवस्थापनाचे फॉरेन्सिक विश्लेषण या बाबींचा अभ्यास आवश्यक आहे. असा साकल्याने विचार करून केलेली गुंतवणूक फलदायी होण्याची शक्यता खूप वाढते, असा अभ्यास आत्मविश्वासही वाढवतो.
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील सुमारे ६९% मालमत्तेची उलाढाल करणारी ‘कॅम्स’ (कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि.) ही देशातील सर्वांत मोठी म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी आहे. या द्विमक्तेदारी (ड्युओपोली) क्षेत्रातील दुसरी मुख्य स्पर्धक केफिन टेक्नॉलॉजीज या कंपनीचा बाजारातील वाटा सुमारे ३१ टक्के आहे. कॅम्स ही कंपनी म्युच्युअल फंड, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) आणि विमा कंपन्यांसह विविध वित्तीय संस्थांना तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवते.