
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम २०१(१ए)(ii) आणि कलम २०६सी (७) अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या ‘टीडीएस’ व ‘टीसीएस’च्या रकमेचा भरणा करण्यास विलंब झाल्याबद्दल आकारण्यात येणाऱ्या व्याज व विलंब शुल्कात पूर्णतः वा अंशतः माफी देण्याबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी २८ मार्च २०२५ च्या अधिसूचनेनुसार, ‘टीडीएस’ व ‘टीसीएस’च्या रकमेचा भरणा करण्यास विलंब झाल्याबद्दल आकारण्यात येणाऱ्या व्याज व विलंब शुल्कात माफी देण्याचा विचार करण्यास मुख्य प्राप्तिकर आयुक्त आणि प्राप्तिकर महासंचालक यांना अधिकृत केले होते. ही माफी विहित अटींच्या पूर्ततेच्या अधीन होती.