
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ३० एप्रिल २०२५ रोजी एका अधिसूचनेद्वारे प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म-३ जारी केला आहे. लेखापरीक्षण (ऑडिट) आवश्यक नसलेल्या करदात्यांसाठी हा फॉर्म दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै, तर ऑडिट आवश्यक असणाऱ्यांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी हा फॉर्म उपयुक्त आहे. यात पगार, घर, भांडवली नफा, इतर स्रोत आणि व्यवसायातून उत्पन्न यासह विविध उत्पन्नाच्या बाबींचाही समावेश होतो. यंदा त्यात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.