
शशांक वाघ- निवृत्त बँक अधिकारी
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार, चेक अर्थात धनादेश वटण्याची ‘चेक ट्रंकेशन सिस्टिम’ (सीटीएस) (Cheque Truncation System-CTS) प्रणाली चार ऑक्टोबर २०२५ पासून अधिक जलद होणार आहे. ही प्रणाली अधिक जलद करण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे.