

Balancing Care and Discipline: The Key to Healthy Parenting
sakal
डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न : माझा मुलगा दहा वर्षांचा आहे. अलीकडे तो टीव्हीवरील कंडोम, सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती, तसेच चित्रपट किंवा मालिकांमधील चुंबन किंवा जवळिकीची दृश्ये पाहून प्रश्न विचारतो. काही वेळा ‘हे काय आहे?’, ‘हे का वापरतात?’, ‘हे लोक असे का करतात?’ असे निरागसपणे विचारतो. मला खूप अवघडल्यासारखे वाटते. त्याला गप्प बसवावे, विषय बदलावा की त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत तेच समजत नाही. चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य माहिती घरातूनच मिळावी असे वाटते. पण नेमके कसे बोलावे हे कळत नाही.
उत्तर : अनेक पालकांचा हा प्रश्न असतो. पूर्वी अशा विषयांवर फारशी चर्चा होत नसे. परंतु आजची मुले टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे लहान वयातच अनेक गोष्टी पाहतात. त्यामुळे त्यांना प्रश्न पडणे अत्यंत नैसर्गिक आहे.