Premium|Rare Earth Minerals : दुर्मीळ खनिजांचे महागडे अर्थकारण

China's monopoly : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक ती दुर्मीळ खनिजं आणि त्यांचे साठे यांची सूत्र सध्या चीनकडे आहेत. चीनच्या वर्चस्वाला आव्हान द्यायचं तर उत्पादनातील आत्मनिर्भरता हाच पर्याय आहे.
China's monopoly rare minerals
China's monopoly rare mineralsE sakal
Updated on

Rare Earth Crisis: How China's Grip on Minerals Threatens India's EV and Green Tech Dreams

गोपाळ कुलकर्णी

gopal.kulkarni@esakal.com

इलेक्ट्रिक वाहनांचे ऊर्जा केंद्र हे भूगर्भातील दुर्मीळ खनिज संपदेमध्ये (रेअर अर्थ मटेरिअल) दडले आहे. जगातील प्रत्येक देशाला ही खनिजे हवी आहेत. यासाठी ‘ड्रील बेबी ड्रील’ हे बड्या देशांच्या आर्थिक धोरणाचे मध्यवर्ती सूत्र बनू पाहते आहे. सध्या जगाच्या दुर्दैवाने या खनिज संपत्तीची सारी सूत्रे ही विस्तारवादी चिनी ड्रॅगनच्या हाती एकवटली आहेत. चीन म्हणेल ती पूर्व दिशा अशी आजची स्थिती.. चीनच्या या वर्चस्वाला आज ना उद्या आव्हान द्यावेच लागेल. येथेही उत्पादनातील आत्मनिर्भरता हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे.

चीन सरकार सध्या या खनिजांच्या निर्यातीसाठी परवाना प्रणालीचा वापर करते आहे ते इतर देशांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी; त्यामुळे चीनने हात आखडता घेताच जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली. यामुळे विशेषतः अमेरिका आणि युरोप यांना होणारा पुरवठा विस्कळित झाला. भारतालाही याची झळ सोसावी लागली. व्यापारी आघाडीवर ट्रम्प यांचा सूर मवाळ होण्यामागेही हीच खनिजे कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com