

Understanding Contrarian Investing and Opportunities in Mutual Funds
Sakal
अभिजीत बोंगिरवार,व्यवस्थापकीय संचालक, ग्रोफिन वेल्थ प्रा.लि.
कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग (Contrarian Investing) हे बाजारातील सध्याच्या प्रवाहाच्या किंवा लोकप्रिय भावनेच्या विरुद्ध जाणारे धोरण आहे. लोकप्रिय आणि वेगाने वाढणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याऐवजी, कॉन्ट्रॅरियन गुंतवणूकदार बाजारातील अशा घटकांकडे पाहतात ज्यांचा बहुतांश लोक टाळाटाळ करत आहेत आणि तिथली नकारात्मकता किंवा निराशा अतिप्रमाणात आहे का, असा विचार करतात. यामागील मुख्य कल्पना सोपी आहे, बाजार नेहमीच मालमत्तेचे योग्य मूल्य ठरवतो असे नाही. जेव्हा एखादे क्षेत्र किंवा कंपनी लोकांच्या पसंतीतून उतरते, तेव्हा तिच्या शेअरच्या किमती मूळ मूल्यापेक्षा वेगळ्या होतात आणि याच फरकामध्ये संधी दडलेली असते.