

Indian Corporate Earnings Show Strong Growth as Companies Report Better Quarterly Results and Higher Revenue and Profits
sakal
-गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय शेअर बाजारासाठी सध्या एक सकारात्मक संकेत दिसून येत आहे. देशातील कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली वाढ दिसत असून, कॉर्पोरेट क्षेत्राची कमाई पुन्हा मजबूत होत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत निकाल जाहीर केलेल्या १,३०३ कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, विक्री, कार्यचालन नफा आणि निव्वळ नफा या तिन्ही निकषांमध्ये दमदार वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जून २०२२ नंतरचा हा सर्वांत मजबूत निकालांचा हंगाम ठरला आहे.