
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
आजकाल कर्ज घ्यायचे म्हटले, की सर्वांच्या मनात सर्वप्रथम विचार येतो तो क्रेडिट स्कोअरचा! क्रेडिट स्कोअर जितका चांगला, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते; तसेच व्याजाचा दरदेखील कमी असतो. आपल्या देशात चार प्रमुख क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या व्यक्तींसाठी क्रेडिट स्कोअर आणि कंपन्या किंवा व्यवसायांसाठी क्रेडिट रँक तयार करतात. ट्रान्सयुनियन सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि सीआरआयएफ हाय मार्क अशा चार क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या किंवा क्रेडिट ब्युरो कार्यरत आहेत. यातील ‘सिबिल’ हे नाव बहुतेकांच्या परिचयाचे आहे.