
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
इंटरनेट वापरामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आपल्याकडे सुमारे ६० टक्के (८० ते ८५ कोटी) लोक इंटरनेटचा वापर करतात. परिणामत: आजकाल दैनंदिन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर नेटबॅंकिंग, मोबाईल बँकिंग; तसेच यूपीआय अॅपच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येत आहे. यूपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा प्रकारे ऑनलाइन व्यवहार करणे सोयीचे असले, तरी यातून होणारी सायबर फसवणूकही (फ्रॉड) चिंतेची बाब झाली आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि आपले संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सायबर इन्शुरन्स पॉलिसी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.