

Avoid downloading APK files from unknown sources and keep your device updated to stay protected from cyber fraud.
Sakal
शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
अलीकडे सायबर गुन्हेगार लोकांना आरटीओ, कोर्ट, एमएनजीएल अशा विविध सरकारी खात्यांच्या नावांवर एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडियावर मेसेजद्वारे किंवा जवळच्या व्यक्तींच्या अथवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने खोटे व्हॉट्सॲप मेसेज पाठवून त्याद्वारे ‘एपीके’ फाइल पाठवतात. मोबाइल गेममध्ये किंवा बक्षीस लागले आहे किंवा निवड झाली आहे, अशा संदेशांद्वारे फसव्या लिंक पाठविल्या जातात. निमंत्रण देण्याच्या बहाण्यानेसुद्धा अन्य धोकादायक फॉरमॅटमध्ये फाइल पाठवल्या जातात किंवा लिंक दिली जाते. अशा लिंकवर क्लिक केल्यावर ‘एपीके’ फाइल आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केली जाते आणि सायबर गुन्हेगार आपल्या मोबाइलचा ताबा घेऊन, त्याद्वारे जीपे किंवा यूपीआय, बँक खात्याची माहिती आणि पासवर्ड चोरून पैसे काढून घेतात. अशा सायबर फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.