

Strong and unique passwords, MFA and safe digital habits can significantly improve online security.
Sakal
शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, डिजिटल व्यवहार करताना कोणत्या सुरक्षा उपायांचा अवलंब करता येईल, याची माहिती प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. पासवर्ड म्हणजे ‘परवलीचा शब्द’, ‘गुप्तशब्द’ किंवा ‘गुपित शब्द’. डिजिटल युगात आपली ओळख निश्चित करण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. आपण इंटरनेट आधारित पोर्टल, वेबसाइट किंवा बँक खाते वापरताना यूजरनेम आणि पासवर्ड आवश्यक असतो. आपणच त्या खात्याचे अधिकृत वापरकर्ता आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पासवर्डचा उपयोग होतो. त्यामुळे पासवर्ड ही आपल्या स्वसंरक्षणाची पहिली सुरक्षा रेषा आहे.