Premium|Debt Trap : कर्ज गरज की सवय? ‘हप्ता परवडतो’ म्हणताना सापळा वाढतोय

Why Borrowing Has Become a Lifestyle : ‘आत्ता खरेदी करा, नंतर पैसे भरा’ या बदलत्या संस्कृतीमुळे कर्ज घेणे सहज झाले आहे. गरज आणि इच्छा यातील सीमारेषा पुसट होत असल्याने आर्थिक सापळ्याचा धोका वाढतो.
Why Borrowing Has Become a Lifestyle

Why Borrowing Has Become a Lifestyle

esakal

Updated on

सई डिग्रजकर - sai_a8@rediffmail.com

पूर्वी कर्ज हा आत्यंतिक आर्थिक गरज भागवण्याचा आधार होता. आता अनेकदा ते इच्छांना लगेच पूर्ण करण्याचे साधन बनले आहे. ‘ आत्ता खरेदी करा, नंतर पैसे भरा’ ही संकल्पना इतकी सामान्य झाली आहे, की वाट पाहणे, बचत करून खरेदी करणे किंवा एखादी गोष्ट काही महिने पुढे ढकलणे हे जणू जुन्या पिढीचे किंवा कालबाह्य तत्त्वज्ञान वाटू लागले आहे. यातूनच कर्जाच्या जाळ्यात आपण गुरफटत आहोत. त्यामुळे कर्ज ही नक्की गरज आहे, सवय आहे, की आर्थिक सापळा आहे, याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

क काळ होता, जेव्हा मोठी खरेदी म्हणजे अनेक महिने बचत, घरात चर्चा, गणित आणि मगच निर्णय घेतला जात असे. त्यामुळे वस्तूची किंमत, गरज आणि आर्थिक क्षमता यांचा विचार स्वाभाविकपणे होत असे. आज चित्र पूर्ण बदलले आहे. मोबाइल घ्यायचा असो, टीव्ही, फर्निचर, सुट्टीचे पॅकेज, उच्च शिक्षण, लग्नाचा खर्च किंवा अगदी दैनंदिन वापराच्या वस्तू; एकूण किंमत किती आहे यापेक्षा दरमहा किती हप्ता भरावा लागेल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे. दरमहा भरावी लागणारी रक्कम ही केवळ पैसे भरण्याची सोय राहिलेली नाही; ती अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. किंमत परवडते की नाही, यापेक्षा हप्ता परवडतो का, हा प्रश्न आज अनेकांच्या खरेदीचा केंद्रबिंदू बनला आहे.

‘‘सर, महिन्याला एवढाच हप्ता बसेल...’’

‘‘मॅडम, बिनव्याजी हप्ता उपलब्ध आहे...’’

‘‘फक्त आधार कार्डवर त्वरित कर्ज मंजूर...’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com