Premium|Decluttering : ‘डी-क्लटरिंग’ जीवनशैलीचा मंत्र; कप्पा आवरा, मन मोकळं करा, व्यवसायात कार्यक्षमता वाढवा

Business Productivity : आयुष्यातील आणि व्यवसायातील अनावश्यक गोष्टी कमी केल्याने मन, कामाची जागा आणि डिजिटल माहिती व्यवस्थित राहते. यामुळे गोंधळ कमी होऊन निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता वाढते.
Business Productivity

Business Productivity

esakal

Updated on

चकोर गांधी - chakorgandhi@gmail.com

आपण आयुष्यात आणि व्यवसायात सतत नवनव्या गोष्टी जोडत राहतो; पण नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याची सवय मात्र लावत नाही. परिणामी, मन गोंधळते, टेबल भरते, संगणकाचा डेटा वाढतो आणि निर्णयक्षमताही मंदावते. यशस्वी व्यावसायिकांची एक समान सवय असते, ते नियमितपणे आपला प्रत्येक ‘कप्पा’ आवरतात. कारण त्यांना माहीत असते, की अनावश्यक गोष्टी कमी केल्याशिवाय आवश्यक गोष्टींना जागा मिळत नाही.

'कप्पा' हा शब्द केवळ कपाटातील किंवा टेबलातील जागेसाठी नाही. मनाचा कप्पा, खिशाचा कप्पा, कागदपत्रांचे नियोजन, संगणकातील डेटा, मोबाइलमधील माहिती, अगदी चाव्यांचा जुडगाही या संकल्पनेत येतो. साधा सिद्धांत असा आहे, की नको असलेल्या गोष्टी कमी केल्या, तर आवश्यक गोष्टी लगेच सापडतात. हा विषय वरकरणी अतिशय सोपा वाटतो; पण त्यामागे अत्यंत गहन अर्थ दडलेला आहे. हा सिद्धांत समजून घेतला आणि प्रत्यक्ष जीवनात व व्यवसायात अमलात आणला, तर त्याचे अनेक फायदे होतात. मनाला शांतता मिळते, कामातील गोंधळ कमी होतो आणि व्यवसायातील कार्यक्षमता वाढते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com