अर्थभान : फक्त पैसा नाही, आयुष्याचा समतोलही हवा!

जनरेशन झेड आणि मिलेनियल्सना फक्त जास्त पगार नव्हे, तर वर्क-लाइफ बॅलन्स, मानसिक सुरक्षितता, लवचिकता आणि अर्थपूर्ण काम महत्त्वाचे; जुन्या ताणतणावपूर्ण यशाच्या संकल्पनांना आव्हान
Declining Corporate Ambition: Why Only 6 Percent of Youth Aspire for Leadership Roles

Declining Corporate Ambition: Why Only 6 Percent of Youth Aspire for Leadership Roles

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

आजची तरुण पिढी फक्त पैशांच्या मागे लागली आहे, अशी ओरड आपण अनेकदा ऐकतो, मात्र अलीकडेच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणाने हा समज चुकीचा ठरवला आहे. जनरेशन झेड (नव्या पिढीतील तरुण) आणि मिलेनियल्स (नवसहस्रक पिढी) ही पिढी महत्त्वाकांक्षी नक्कीच आहे; पण त्यांची महत्त्वाकांक्षा ‘फक्त जास्त पैसा आणि पद’ यापुरती मर्यादित नाही, असे डेलॉइट या जागतिक कंपनीच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षणात ४४ देशांतील सुमारे २२,५०० तरुण कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणानुसार, आजची तरुण पिढी ‘वर्क-लाइफ बॅलन्स’, मानसिक सुरक्षितता, लवचिकता आणि अर्थपूर्ण कामाला अधिक महत्त्व देते. करिअरमध्ये पैसा हवा आहे, प्रगती हवी आहे, पण हे सर्व मानसिक थकवा आणि सततच्या तणावाच्या किमतीवर नको, ही त्यांची भूमिका आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com