शेअर बाजार : डिजिलॉजिक सिस्टीम्स

Digilogic Systems Share Analysis: संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी टेस्टिंग व सिम्युलेशन प्रणाली विकसित करणाऱ्या डिजिलॉजिक सिस्टीम्सच्या आर्थिक कामगिरी, ऑर्डर पाइपलाइन, विस्तार योजना आणि गुंतवणुकीतील जोखमींचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.
Digilogic Systems Share Analysis:

Digilogic Systems Share Analysis:

esakal

Updated on: 

भूषण ओक : शेअर बाजार विश्‍लेषक

हैदराबादस्थित डिजिलॉजिक सिस्टीम्स ही, संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील टेस्ट, मेजरमेंट आणि सिम्युलेशन पुरवणारी एक डीप-टेक कंपनी आहे. किचकट इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली प्रत्यक्षात कशा काम करतील याची चाचणी या क्षेत्रात आवश्यक असते आणि ही कंपनी त्यासाठी लागणाऱ्या प्रणाली म्हणजे ऑटोमेटेड टेस्ट इक्विपमेंट, चेकआउट सिस्टीम्स, रडार/इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिम्युलेटर, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक सोल्यूशन्स विकसित करते व पुरवते. कंपनीची जानेवारी २०२६ मध्ये एसएमई मंचावर नोंदणीकृत झाली आहे. माजी वायुसेना अधिकारी व ३० हून अधिक वर्षांचा तंत्रज्ञान अनुभव असलेले जे. मधुसूदन वर्मा जेट्टी कंपनीचे प्रवर्तक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. अभेद्य सिस्टीम्स नावाची कंपनीची एक उपकंपनी रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि संप्रेषण प्रणालींसाठी मे २०२६ मध्ये स्थापन झाली असून, तिचे व्यावसायिक उत्पादन २०२९ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...