
शिरीष देशपांडे
deshpande.06@gmail.com
अलीकडे ‘डिजिटल ॲरेस्ट’ हा शब्द सातत्याने कानावर पडत आहे. सायबर गुन्हेगार डिजिटल ॲरेस्ट केल्याचे सांगून अनेकांना लाखो, कोट्यवधी रुपयांना लुबाडत आहेत. रोज अशी किमान एक तरी घटना समोर येत असून, डिजिटल ॲरेस्टच्या गुन्ह्यांनी उच्चांक गाठल्याचे दिसत आहे. तरीही अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत. सायबर गुन्हेगार नवनव्या क्लृप्त्या काढून लोकांना फसवत आहेत. त्यांच्या जाळ्यात सर्वसामान्य लोकच नव्हे, तर आयएएस, आयपीएस अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी, डॉक्टर अशा उच्चशिक्षित लोकांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.