
पराग गोरे
parag@businessicon.in
इंटरनेटवर आणि विविध समाज माध्यमांत (सोशल मीडिया) आपल्या व्यवसायाच्या पाऊलखुणा (फूटप्रिंट) कशा आहेत, याचा व्यवसायाच्या यशावर खूप मोठा परिणाम होतो. प्रत्येक गोष्ट ‘गुगल’ करून पाहणारा किंवा सोशल मीडियावर शोधणारा आजचा ग्राहक ब्रँडचा डिजिटल जगातील वावर बारकाईने तपासत असतो. नवा ग्राहक मिळवण्याची, इतर ब्रँडच्या ग्राहकाला आपले उत्पादन वापरून पाहायला उद्युक्त करण्याची आणि खात्रीशीर ग्राहक मिळवण्याची संधीच जणू या माध्यमातून चालून आली आहे.