
सुधाकर कुलकर्णी,
sbkulkarni.pune@gmail.com
आपल्यापैकी बहुतेकांना कारणपरत्वे गृहकर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज अशी विविध कर्जे घ्यावे लागतात.
कर्ज देणारी संस्था, तेथील कर्मचारी; तसेच इतर अनुषंगिक व्यक्ती ज्यांचा कर्जमंजुरीत सहभाग असतो, अशा मानवी सहभागामुळे कर्ज घेणे ही एक किचकट व वेळखाऊ बाब होऊन जाते.
यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय तर होतोच; पण वेळेत कर्ज न मिळाल्याने प्रसंगी एखादी संधी हातची निघून जाते किंवा जास्त रक्कम देऊन तीच वस्तू घ्यावी लागते. मात्र, आता कर्जप्रक्रियाही डिजिटल झाल्याने पूर्वीची किचकट, वेळखाऊ कर्जप्रक्रिया सुलभ झाली आहे.