
सुधाकर कुलकर्णी
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस यांसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीचे आर्थिक व्यवहारातील प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता चेकने पेमेंट करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अर्थात, आजही ज्येष्ठ नागरिक किंवा डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्यासाठी उत्सुक नसलेले लोक चेकचा वापर करतात. त्यामुळे आजही चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय आहे.