

e-SIM Fraud Awareness
sakal
लवकरच मोबाईलसाठी नवी सिम कार्ड पद्धत (e-SIM-embeded Subscriber Identity Module) अमलात येणार आहे. यात फोनमध्ये कायमस्वरूपी डिजिटल सिम कार्ड घातलेले असते. या पार्श्वभूमीवर, नेहमीचे सिम कार्ड अपग्रेड करून ई-सिम कार्डची प्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगून सायबर चोरटे फसवणूक करत आहेत. अलीकडेच मुंबईतील एका डॉक्टरांना दूरसंचार नियामक प्राधिकरणामधून (ट्राय) बोलत आहे, ई-सिम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉक्टरांना आलेला ‘ओटीपी’ घेऊन बँकेतून ११ लाख रुपये पळवले. फसवणुकीच्या नव्या प्रकारापासून सुरक्षित राहायचे असेल, तर काही बाबतीत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.