
लक्ष्मीकांत श्रोत्री - आर्थिक सल्लागार
अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना फंड निवडणे आणि त्यांचा पोर्टफोलिओ करणे सहज जमत नाही. काहींना म्युच्युअल फंड हवे असतात, त्याचबरोबर शेअरची लवचिकता आणि कमी खर्च हे पर्यायदेखील हवे असतात. अशी सर्व वैशिष्ट्ये ‘ईटीएफ’मध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) आढळून येतात. त्यामुळे ‘ईटीएफ’ हे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एक सुरक्षित, पारदर्शक व खर्चिकदृष्ट्या फायदेशीर गुंतवणूक माध्यम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार, निर्देशांकानुसार अशा विविध प्रकारांमध्ये ‘ईटीएफ’ उपलब्ध आहेत. जसे सेक्टर, निर्देशांक (बीएसई ३०, निफ्टी ५०, स्मॉल कॅप २५०, मिड कॅप १५०, नॅस्डॅक १०० असे निर्देशांक), गोल्ड ईटीएफ, सिल्व्हर ईटीएफ, डेट ईटीएफ आदी.