
नेहा लिमये, कंपनी सेक्रेटरी
neha.a.limaye@gmail.com
आमच्या आणि त्या आधीच्या कित्येक पिढ्यांसाठी वडिलांची छबी ही या ‘दंगल’ सिनेमातल्या ओळींसारखीच होती. बाबा म्हणजे कडक शिस्त हे समीकरण अतिशय पक्कं होतं. मात्र, हाच ‘बाबा’ मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशी चालली की हळवा होतो. तरुणपणी आपल्या हौशीमौजी बाजूला ठेवून मुलांसाठी भरभक्कम आर्थिक तरतूद करणारा ‘बाबा’ म्हातारपणी आपला बोजा मुलांवर पडू नये यासाठीदेखील पैपै साठवत असतो. अशा ‘बाबा’साठी ‘फादर्स डे’चे औचित्य साधून काही उत्तम आर्थिक भेटवस्तू देता आल्या तर?...