
नंदिनी वैद्य
nandineevaidya@yahoo.com
पित्याने आधीपासून काही बाबतीत मुलांना शिस्त लावणे इष्ट ठरते. नात्यातील आर्थिक पैलूकडे जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे. पित्याने काही पथ्ये पाळायची असतात, तशीच मुलानेही त्याच्या जबाबदाऱ्या समजून घेऊन त्यानुसार आपले वर्तन ठेवणे आवश्यक ठरते, तेव्हाच ‘फादर्स डे’ खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल.
वडील मुलांना त्यांच्या जन्मापासून ती स्वतःच्या पायावर उभी राहेपर्यंत म्हणजे साधारण २५-२६ वर्षांपर्यंत जो आर्थिक, भावनिक सबळ आधार देतात, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. मुलगा/मुलगी आणि वडील या नात्याचा भावनिक अंगाने विचार केला जातोच; त्याप्रमाणेच तो आर्थिक अंगानेही करणे आवश्यक असते. त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडणारा हा लेख...