

Market movements spark debate over FII selling versus smart money strategies.
sakal
-गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात ‘एफआयआय’ मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. मात्र, ही ‘विक्री’ नसून ‘निवड’ आहे. ‘एफआयआय’ भारतीय बाजारातून बाहेर पडत नसून, ते आपला पैसा अधिक परतावा देणाऱ्या मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्राकडे वळवत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, ‘एफआयआय’नी त्यांच्या गुंतवणुकीची दिशा बदलली आहे. ते भारतीय बाजाराचा निरोप घेत नसून, ते वाढीच्या शोधात आहेत. सोबतच्या चौकटीवरून हे स्पष्ट होते.