
High-Frequency Trading Scam: Jane Street’s ₹4,843 Crore Blow from SEBI Explained
कौस्तुभ केळकर
kmkelkar@rediffmail.com
भारतीय शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे उलाढालही वाढत आहे. त्यामुळे अनेक गैरपद्धतीदेखील वापरल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी ‘सेबी’ अनेक उपाययोजना करत आहे. अलीकडेच अल्गोरिदम वापरून आणि गैरप्रकार करून नफा मिळवणाऱ्या ‘जेन स्ट्रीट’ कंपनीवर ‘सेबी’ने कठोर कारवाई करून अशा बेकायदा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना दणका दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.