Premium| Financial fitness: पैशांसोबतचे नाते

‘पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही मोठी आहेच; पण फक्त मनाचा मोठेपणा पुरेसा नाही, तर जोडीला आर्थिक स्वास्थ्य हवेच.’ असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.
आर्थिक स्वास्थ गरजेचे आहे.
आर्थिक स्वास्थ गरजेचे आहे.ई सकाळ
Updated on

सुधीर खोत

sudhirkhot@kaijing.in

लहानपणापासून मी ‘पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी’ हे ऐकत आलो होतो. मात्र, वय वाढू लागले तसा माझा मी विचार करू लागलो. पैशाचा विचार, भावनांचा कल्लोळ, घरदार, समाज, पगाराचे आकडे, तफावत, वैचारिक प्रगल्भतेचे दुर्भिक्ष्य, कोलमडणे, उभे राहणे, धावणे, जिंकणे, हारणे हे सारे अनुभवताना व इतरांचे बघताना ते वाक्य मी माझ्या परीने पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि त्या वाक्याला एक पुस्ती जोडली, ती अशी ‘पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही मोठी आहेच; पण फक्त मनाचा मोठेपणा पुरेसा नाही, तर जोडीला आर्थिक स्वास्थ्य हवेच.’ कारण माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तो पैसा हवाच. याचबरोबर माणसाला त्याच्या क्षमतेनुसार पैसा कमावण्याची गरज असते. कारण पैसा आला, की स्वातंत्र्य मिळते, सुरक्षित असण्याची भावना निर्माण होते. मात्र, आपल्याकडे आर्थिक विषयाची जडणघडण शालेय शिक्षणात अजिबात केली जात नाही. आयुष्यात पैशाचं असलेले अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान मुलांना समजावून दिले जात नाही. पैसा कसा कमवावा, कसा हाताळावा? वाढवून समृद्ध कसा करावा, याबाबतचे मार्गदर्शन कोणीच करताना दिसत नाही. दुर्दैवाने आपण सर्वजण अशाच वातावरणात वाढत गेलो आणि परिणामी, पैशाबद्दलचे आपले विचार अपरिपक्व राहिले. तुमचे तुमच्या पैशासोबत एक विशिष्ट नाते तयार झाले. आपल्या आर्थिक जीवनातील यश आणि स्थिरता यासाठी आपले पैशाशी असलेले नाते अतिशय महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com