
सुहास राजदेरकर, suhas.rajderkar@gmail.com
भारतामध्ये घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील तीन वर्षांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या सर्वांचा त्यांच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम अतिशय मोठा आणि गंभीर आहे आणि त्यामुळेच या विषयावर मोकळेपणाने बोलण्याची आणि हा विषय समजून घेण्याची मोठी गरज आहे.