
डिसेंबर महिन्यात श्रीदत्त जयंती होती. भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरू होते, अशी श्रद्धा आहे आणि त्या प्रत्येक गुरूकडून आपण काहीतरी चांगली गोष्ट शिकावी; जेणेकरून आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकते; तसेच वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सदगुण घ्यायचे, हेदेखील या गुरूंकडून शिकायला मिळते. या चोवीस गुरूंकडून अशा काही महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतील, ज्या आपल्याला आर्थिक नियोजनातही कायम उपयोगी पडतील.