

Adaptive Asset Optimization: Unpacking the Unconstrained Mandate of Flexi-Cap Funds
sakal
तेजस काजरेकर, संस्थापक, गोल्डन मीन फायनान्शियल सर्व्हिसेस एलएलपी
इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचा एक सोपा मार्ग देतात. ते महागाईपेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता राखतात; तसेच विविधीकरण, तरलता व तुलनेने करकार्यक्षमता प्रदान करतात. तरीही बहुतांश गुंतवणूकदार मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, की लहान कंपन्यांच्या वेगवान वाढीचा पाठलाग करावा? या संभ्रमात अडकतात. याच ठिकाणी फ्लेक्सी कॅप फंड महत्त्वाची भूमिका बजावतात.