

Flexi Cap mutual funds allow fund managers to shift investments across large, mid and small-cap stocks, helping investors navigate uncertain market conditions.
sakal
मकरंद औंढेकर , पार्टनर , इनेस्ट डिस्ट्रिब्यूटर
कोणत्याही जहाजाचा कॅप्टन समुद्र शांत असेल, अशी अपेक्षा ठेवून प्रवासाला निघत नाही. वादळे पूर्वसूचना न देता येतात; वाऱ्याची दिशा बदलते आणि सर्वांत अनुभवी कॅप्टनलाही क्षितिजाच्या पलीकडे काय आहे, याचा अंदाज लावणे कठीण जाते. एक चांगला कॅप्टन हवामानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, शिडांची दिशा बदलतो, गरजेनुसार मार्ग बदलतो आणि प्रवास योग्य दिशेने सुरू ठेवतो. गुंतवणुकीचे कामही अगदी अशाच पद्धतीने चालते.