
अॅड. विनायक आगाशे - ज्येष्ठ कर सल्लागार
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर व्यापाराचे झालेले जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रसार याचे वारे वाहू लागले होते. त्यात करक्षेत्रदेखील मागे नव्हते. फ्रान्ससारख्या देशाने ‘व्हॅट’सारख्या नव्या करप्रणालीचा स्वीकार करून इतर देशांपुढे एक नवा पर्याय ठेवला. आपल्या देशाने येथेच न थांबता ‘व्हॅट’चे पुढचे पाऊल म्हणजेच वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ कायदा अंमलात आणला. त्याला आता (ता.१ जुलै) आठ वर्षे पूर्ण होत असून, तो यशस्वीरीत्या राबवला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यातदेखील ‘जीएसटी’चा सिंहाचा वाटा आहे. ज्या उद्देशाने हा कायदा अंमलात आणला गेला तो उद्देशदेखील साध्य झालेला आहे.