Gold And Silver Ratesakal
Sakal Money
Gold And Silver Rate: सोन्याचा भाव जाणार '1 लाख पार'; पण कधी? मोठी अपडेट आली समोर
Diwali Gold Rate News: सोन्याचा भाव वाढल्याने व्यवहाराचे मूल्य वाढले आहे.
Latest Pune News: गेल्या सहा महिन्यांत भाव वाढल्यानंतरही दिवाळीत सोने खरेदीत उत्साह दिसून आला. मुहूर्त, लग्नसराई आणि गुंतवणूक या सर्वांचा मेळ घालत सोने खरेदी करण्यासाठी शहरातील सराफ पेढीत खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा देखील सराफ बाजाराला झळाळी येत मोठी उलाढाल झाली.
बाजारात आलेले नवीन प्रकारचे दागिने आणि लग्न किंवा इतर दुसऱ्या कारणांसाठी होणारी खरेदी यामुळे सराफ पेठेत दिवाळीच्या काळात गर्दी दिसून आली. ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने सराफ व्यावसायिकांमध्येदेखील उत्साह होता. दिवाळीच्या कालावधीमध्ये सोन्याच्या विक्रीने नवीन उच्चांक नक्कीच गाठलेले आहेत. वजनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर गतवर्षीपेक्षा दहा ते पंधरा टक्के सोन्याची विक्री कमी झालेली आहे. मात्र, मूल्याच्या संदर्भात उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
