

Gold Price Drop: सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण सुरुच आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर तांत्रिक कारणामुळे उशिराने बाजार सुरु झाला. जेव्हा प्रत्यक्ष ट्रेडिंगला सुरुवात झाली दोन्ही धातूंमध्ये घसरण बघायला मिळाली. सोन्याच्या किंमतींमध्ये ३ हजार २०० रुपयांची घट तर चांदीचे भाव ३ हजार ८०० रुपयांनी कमी झाले. ही घसरण केवळ एमसीएक्सवरच नव्हे तर देशांतर्गत बाजारातही सोनं-चांदीचे भाव कमी झाले आहेत.