

Major Update: Simplified Process and Digital Reforms in Nomination Facility
Sakal
-मंदार कुलकर्णी, वरिष्ठ बँकिंग अधिकारी
बँकांमधील ठेवी आणि लॉकरसाठी आतापर्यंत एकाच व्यक्तीची नॉमिनी म्हणून नोंद करण्याची तरतूद होती. परंतु, एक नोव्हेंबर २०२५ पासून नव्या तरतुदी लागू झाल्या आहेत. त्यानुसार, आता एकापेक्षा अधिक, परंतु जास्तीत जास्त चार व्यक्तींचे नॉमिनेशन करता येणार आहे, त्यामुळे एकापेक्षा अधिक मुले किंवा वारस असलेल्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे. प्रत्येक मुलाची किंवा वारसाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती समान नसते आणि त्यानुसार त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. पालकांनाही जी मुले त्यांचा सांभाळ करतात किंवा ज्यांना त्यांच्या पैशाची, साधनांची अधिक गरज आहे त्यांनाच आपल्या मृत्युपश्चात आपले पैसे मिळावे, असे वाटत असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने बँकिंग कायदा २०२५ मंजूर करून, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ मधील नामांकनाबाबतच्या कलम ४५ झेडए, ४५ झेडसी, ४५ झेडईमध्ये सुधारणा केल्या आहेत. बँकांमधील ठेवी अथवा लॉकरसाठी नॉमिनेशन करताना दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.