
सुधाकर कुलकर्णी
डिजिटल इंडियाचे पुढचे पाऊल म्हणून नुकतीच म्हणजे २५ नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्र सरकारने पॅन २.० योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे, तर यासाठी १४३५ कोटी रुपये इतकी रक्कम देऊ केली आहे. पॅन २.० योजनेमुळे सध्याच्या पॅनमध्ये सुधारणा होणार असून, पॅन कार्डमध्ये क्यूआर कोडचा समावेश होणार आहे. यामुळे पॅनच्या सेवासुविधांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून, आता पॅन; तसेच टॅनसंबंधित मूलभूत; तसेच अनुषंगिक सर्व सेवासुविधा आता डिजिटल पद्धतीने एका युनिफाइड पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.