

Green Shoe Option: A Tool to Control Post-Listing Volatility
Sakal
अशोक जोशी, निवृत्त बँक अधिकारी
केंद्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रमधील पाच टक्के हिस्सा विकण्यासाठी ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंर्तगत बोली लावण्यासाठी खुला केला. पहिल्याच दिवशी शेअरच्या निर्धारित उद्दिष्टाच्या ४०० टक्क्यांपेक्षा जास्त बोली लागली, त्यामुळे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (दीपम) ‘ग्रीन शू’ पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूचित केले. त्यानुसार सरकारने यात ‘ग्रीन शू’ पर्यायाचा पूर्णपणे वापरही केला; ज्यामुळे एकूण निर्गुंतवणूक नियोजित पाच टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गेली आहे. सध्या सरकारचा या बँकेत ७९.६० टक्के हिस्सा आहे. सहा टक्के हिस्सा कमी केल्यामुळे, सरकारचा या बँकेतील हिस्सा ७५ टक्क्यांच्या खाली येईल व बँक २५ टक्के पब्लिक शेअरच्या म्हणजेच किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग (एमपीएस) मानदंडाची पूर्तता करू शकेल. या सर्व घडामोडींमुळे पुन्हा ‘ग्रीन शू’ पर्याय समोर आला.