

Government Clears Micro ATM Services to Expand Rural Banking
sakal
ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात बँकिंग पोहोचविण्यासाठी ‘मायक्रो एटीएम’ यंत्रणेला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. यामुळे आता छोट्या गावांमधील किराणा दुकाने, टपाल कार्यालये किंवा स्थानिक सेवा केंद्रांवर ‘मायक्रो एटीएम’ उपकरणाद्वारे रोख रक्कम काढणे अधिक सोपे होईल. मोठ्या एटीएम मशिनसाठी लागणारी जागा, वीज आणि सुरक्षेचा खर्च वाचवून हे छोटे ‘पॉइंट ऑफ सेल’ (PoS) उपकरण आता बँकेचे काम करेल.