
GST rates India 2025
ई सकाळ
राहुल रेणावीकर
rahul@acuris.in
सणासुदीच्या हंगामापूर्वी वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) दराचे सुसूत्रीकरण करून अनेक वस्तू स्वस्त झाल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीला चालना मिळाली. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी अंमलबजावणीला आठ वर्षे होऊनही अद्याप पेट्रोलियम उत्पादने, वीज, रिअल इस्टेट यांचा समावेश ‘जीएसटी’च्या अखत्यारित करण्याबाबत काहीही उल्लेख नाही. जीएसटी प्रणाली अधिक निर्दोष करण्यासाठी अनेक बाबींकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे.