
Why India Needs to Extend the GST Appeal Deadline: Legal and Administrative Perspective
अॅड. विनायक आगाशे, ज्येष्ठ कर सल्लागार
agashevinayak@yahoo.in
वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’च्या सुरुवातीच्या काळात ज्या उणिवा राहिल्या होत्या, त्याबाबत प्रशासनाने कल्पकतेने उपाय योजना करून करदात्यांना दिलासा दिला. त्याचे उदाहरण म्हणजे जाहीर झालेल्या दोन अभय योजना (कलम १६/५ आणि कलम १२८/अ). तशाच प्रकारचा दिलासा कलम १०७ मधील असलेल्या तरतुदीच्या संबंधात हवा आहे. त्याचे कारण म्हणजे अपील करण्यासाठी करदात्यांना दिली गेलेली मुदत पुरेशी नाही. ती वाढविण्याची गरज आहे.