

GSTAT Filing Window: Critical Deadlines and Portal Details
Sakal
अॅड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार
देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी एक जुलै २०१७ पासून लागू झाला. त्याला आता नऊ वर्षे झाली. मात्र, त्यासाठीचे न्यायाधिकरण (ट्रिब्यूनल) स्थापन करणे दीर्घकाळ लांबले होते. त्याचा सहा महिन्यांपूर्वी मुहूर्त लागला. मात्र, अद्याप कामकाज कुठे चालणार, याबाबत संदिग्धता आहे. परंतु, जीएसटी अपिले दाखल करण्याची संगणक प्रणाली तयार असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत पहिल्या अपिलामधील ज्या ऑर्डर कळविण्यात आलेल्या आहेत, त्याविरुद्ध अपील दाखल करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे.