
कृष्ण जोशी
joshikri@gmail.com
गेल्या दहा-पंधरा वर्षांत डिजिटायझेशन, बँक खाते-पॅन-आधार लिंक, जीएसटी यामुळे छोटा व्यावसायिकही करजाळ्यात आला, तर वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’मुळे सर्वसामान्य अर्थव्यवस्थेत (फॉर्मल इकॉनॉमी) प्रवेश करण्याची अनिवार्यता निर्माण झाली. अशा सर्व पावलांमुळे अर्थव्यवस्थेचे सर्वसामान्यीकरण झाले. मात्र, ‘जीएसटी’ कररचनेबाबत करदात्यांच्या काही अपेक्षा आहेत, त्याबाबत टॅक्सबडी डॉट कॉम या करभरणा, करसल्लागार अॅपचे संस्थापक सुजित बांगर यांची ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे उपमुख्य वार्ताहर कृष्ण जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत...