

HDFC Bank headquarters and stock market representation highlighting the pressure on the bank's share price amid margin concerns, deposit mix challenges and investor sentiment.
Sakal
प्रियांका कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
गेल्या काही महिन्यांत एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या भावात मोठी घसरण झाली आहे. हा शेअर १२ ऑगस्ट २०२६ रोजी सुमारे ७२९ रुपयांवर होता आणि तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा सुमारे २८.५५ टक्के खाली होता. या शेअरबाबत बाजाराने सावध भूमिका घेतल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी जागतिक कंपनी ‘जेफरीज’चे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी ख्रिस वूड यांनी त्यांच्या भारतातील दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओमधून एचडीएफसी बँकेचा शेअर वगळला. त्यामुळे या शेअरवरील दबावाची चर्चा वाढली.