
गौरव मोहता
गृहकर्ज ही अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आर्थिक जबाबदारी असते. बहुतांश लोकांनी इतर कोणतेही नसले, तरी गृहकर्ज घेतलेले असते. या कर्जफेडीसाठी दर महिन्याला द्यावा लागणारा हप्ता (ईएमआय) अनेकांसाठी मोठे आव्हान असते. अचानक उद्भवलेल्या अडचणींमुळे कर्जाचा हप्ता भरणे कठीण होते, त्यामुळे कर्जाची जोखीम वाढत जाते. दंड, थकलेले हप्ते यामुळे कर्जाची थकबाकी वाढत जाते आणि आर्थिक संकट गंभीर होत जाते. हे टाळण्यासाठी एक सोपी त्रिसूत्री कामी येईल.