
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाले. देशातील काही लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकालही त्याचवेळी जाहीर झाले. कर्मधर्मसंयोगाने निकालाच्या दिवसाच्या आसपासच आपल्या देशातील शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सकारात्मक सूर आळवायला सुरुवात केली.
त्यामुळे निर्देशांकातील वाढीचे कारण विधानसभा निवडणुकीत, विशेषत: महाराष्ट्रात भाजपला मिळालेले भरघोस यश हे आहे, अशी मांडणी काहीजण करु लागले आहेत. असे खरेच असेल का, हा विचार माझ्या मनात येऊ लागला. ते विचार शब्दबद्ध करण्यासाठी हा लेखनप्रपंच!