डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com
आपल्या आवडीचा, उत्कटतेचा, स्वप्नाचा शोध घेऊन, त्याचा ध्यास घेऊन त्यातून यशस्वी उद्योगिनी होणाऱ्या अनेक महिलांची उदाहरणे आज समोर आहेत. त्यातील एक उदाहरण महिला दिनाच्या निमित्ताने पाहू या. उच्च शिक्षण, त्याद्वारे प्राप्त झालेली स्थिरता, सर्व सुखे, समाधान, प्रसिद्ध यशस्वी डॉक्टर नवरा हे सगळे असताना आपल्या उत्कटतेपायी, स्वप्नपूर्तीसाठी जोखमीच्या, अस्थिरतेच्या उद्योगात उडी मारणारी ही उद्योजिका नक्कीच अनेक महिलांना स्फूर्ती देईल. ही उद्योजिका म्हणजे ‘कारागिरी’ आणि ‘पाल्मोनास’ या ब्रँडच्या संस्थापक पल्लवी मोहाडीकर-पटवारी.