
Recovering from a Market Fall: Smart Portfolio Strategies
कौस्तुभ खोरवाल, kaustubh.corporates@gmail.com
भारतीय शेअर बाजारात सलग दोन महिने घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’मध्ये दहा टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
अशावेळी वैयक्तिकदृष्ट्या पोर्टफोलिओबाबत अनेक ठोकताळे बिघडतात. कारण शेअर बाजारात तात्पुरती घसरण आल्यावर स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरच्या भावात अधिक प्रमाणात घसरण दिसून येते.
शेअर बाजार पुन्हा तेजीत येण्यास सुरुवात झाल्यावर लार्ज कॅप शेअरमध्ये प्रथम वाढ दिसून येते. मग या कोंडीतून कशी सुटका करून घेता येईल, यासारख्या तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.